Saturday, 30 December 2017

आपण कुठे आहात ?

नमस्कार मित्रांनो,

2010 नंतर सात वर्षांनी एकरी रासायनिक खतांच्या वापराबाबत आपण कोणत्या स्थितीत आहात ते सांगा.......

1.सात वर्षात रासायनिक खतांचा वापर दुप्पट झाला आहे.
2. रासायनिक खतांचा वापर तिप्पट झाला आहे.
3.7 वर्षानंतरही तितकाच रासायनिक खतांचा वापर होत आहे.
4. रासायनिक खतांचा वापर कमी झाला आहे.
5. रासायनिक खतांचा वापर शून्य झाला आहे.

देशी गांडूळ

1.शेतकऱ्यांचा मित्र असलेला हा गांडूळ प्राणी शेतीत नेमका असतो तरी कुठे ?

2.तो नेमका काय करतो ?

3.दवणा आणि गांडूळ यात फरक काय ?

4.गांडुळाला शेतकऱ्यांचा मित्र का म्हणायचं ?

5.गांडूळ नसल्यास त्याचे जमिनीवर काय परिणाम होतात ?

6.रासायनिक खतं,कीटकनाशके व तणनाशके मारून गांडूळ मारणे योग्य की अयोग्य.

असे प्रश्न चांगले कृषी तज्ञ,NGO,पर्यावरण प्रेमी,संत मंडळी,समाजसेवक व प्रयोगशील शेतकऱ्यांना सुद्धा पडणे बंद झाले असेल काय ?

#चलानैसर्गिकशेतीकडे

BT vs देशी कापूस

https://youtu.be/uR1ZvLNOh8I

रासायनिक शेती ही मटक्यासारखी

रासायनिक शेती ही मटक्यासारखी आहे.जी उत्पन्नाच्या आशेने आपल्याकडून भरपूर गुंतवणूक करून घेते. पण मटका जसा कधीच लागत नाही तसे रासायनिक शेतीतही इच्छित उत्पन्न कधीच मिळत नाही.रासायनिक शेतीची सुरुवात पंजाब राज्यातून झाली.30-40 वर्षांपूर्व एकही रुपाया खर्च न करता भरपूर उत्पादन काढणारा पंजाबचा शेतकरी,आज लाखो रुपये खर्च करत आहे.शेतीवरील खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि उत्पादन घटत चालले आहे. पंजाब सारख्या राज्यात जेथे 98% जमीन सिंचनाखाली आहे.पंजाब मधील हेक्टरी उत्पादन सुद्धा जागतिक दर्जाचे आहे.तरीसुद्धा पंजाब मधील शेतकरी भारतात सर्वात जास्त कर्जबाजारी आहेत.पंजाब मध्ये सरासरी 41500 रुपये प्रत्येक शेतकऱ्यांवर कर्ज आहे.आज पंजाबचे शेतकरी मोठया प्रमाणात आत्महत्या करत आहेत.सुपीक,संपन्न पंजाबला कर्ज, आत्महत्या,कँसर,बंजर जमीन या गोष्टी रासायनिक शेतीनेच दिल्या.

#चलानैसर्गिकशेतीकडे

पाळेकर गुरुजींना मिळालेले सन्मान

https://youtu.be/vtJywQtZIrs

नैसर्गिक ऊस शेतीचे फायदे

https://youtu.be/dC-mw_8gTM8

गौ रक्षा

आज रासायनिक शेतीमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत पण काही ढोंगी हिंदुत्ववादी संघटना,पक्षमंडळी व संत मंडळी,मीडिया यांना गौ रक्षणाबद्दलच्या चर्चेत जास्त रस आहे.असे ढोंगी लोक नैसर्गिक शेती बद्दल चर्चा करताना दिसत नाहीत.अशा गौ राक्षणाबद्दल बोलणाऱ्या व्यक्तीचा खरोखरच उद्देश चांगला असेल तर अशा लोकांनी नैसर्गिक शेतीचा अभ्यास करणे गरजेचे आहे.आज लाखो शेतकरी नैसर्गिक शेतीच्या मदतीने स्वस्थ,समृद्ध व चिंतामुक्त जीवन जगत आहेत.बरेचसे हिंदू संस्कृती बद्दल आस्था असणारे लोक गाईंच्या रक्षणाबद्दल बोलून आपल्या संस्कृतीची गाई बद्दल असणारी आस्था व्यक्त करतात.गाईंच्या रक्षणाबद्दल बोलताना असे लोक दिवसेंदिवस गाईंची कमी होत जाणारी संख्या याबद्दल दुःखही व्यक्त करतात.पण अशा लोकांकडे गाय पाळणे फायद्याचे कसे ? नेमक्या या महत्त्वाच्या प्रश्नाचे व्यावहारिक व प्रभावी उत्तर नसते.गाईचा चांगल्या पद्धतीने सांभाळ फक्त शेतकरीच करू शकतो.गौ शाळा या गाईंचा सांभाळ करण्यात असमर्थ आहेत.गाईंच्या रक्षणासाठी योग्य,प्रभावी आणि व्यावहारिक मार्गही सांगितला पाहिजे.गाईचे आतडे हे सर्व प्रकारच्या खत व कीटकनाशकांचा कारखाना आहेत.गाईच्या आतड्यात सर्व प्रकारचे शेतीसाठी उपयुक्त जिवाणू भरपूर प्रमाणात आहेत.निसर्गातील जीवाणूंनाच एका बाटलीत भरून,जाहिरातीच्या बळावर करोडो रुपयांच्या सेंद्रिय खतांचा व कीटकनाशकांचे नवे उद्योग उभे रहात आहेत.यांच्या प्रचंड शक्तीपुढे नैसर्गिक शेती मागे पडल्यास पुन्हा शेतकऱ्यांना वाचवणे शक्य होणार नाही.मला वाटतं गाईंना वाचवण्याबद्दल बोलण्यापेक्षा गाईपासून होणारे फायदे जर आपण लोकांना दाखवू शकलो तर ते एक प्रभावी,परिणामकारक पाऊल असेल.मला वाटतं आपल्या समोर आज असे पर्याय उपलब्ध आहेत फक्त त्या पर्यायांना शोधण्याची गरज आहे.

#चलानैसर्गिकशेतीकडे