Saturday, 30 December 2017

युवकांनो तुम्हाला शास्त्रज्ञ बनण्याची संधी

युवकांनो तुम्हाला शास्त्रज्ञ बनण्याची संधी देत आहे,झिरो बजेट नैसर्गिक शेती.
यात तुम्ही स्वतःची बियाणे,
स्वतःचे औषधे कीटकनाशके,
स्वतःच्या पद्धती विकसित करू शकता.
तुमचे स्वतः चे  मार्केट आणि
तुमचे स्वतःचे ग्राहक असतील
यात जिज्ञासा असेल,उत्सुकता असेल
नवनिर्मितीचा आनंद असेल
यात पैसा आहे,प्रसिद्धी आहे
गती आहे,वाढ आहे आणि विकास आहे.
यात स्वतः च्या ज्ञानाचा आणि तारुण्याच्या शक्तीचा जगाला परिचय करून देण्याची संधी आहे.
किती दिवस कंपन्यांच्या फायद्यासाठी शेती कराल ?
स्वतः च्या किरकोळ फायद्यासाठी आणखी किती दिवस आपली जमीन,लोकांचे आरोग्य,पर्यावरण जाणीव पूर्वक खराब कराल ?
नैसर्गिक शेती पद्धतीने तुम्ही मिळवलेला पैसा,प्रसिद्धी आसुरी नसेल तर सात्त्विक असेल यात पूर्ण जगाचे कल्याण असेल.
#चलानैसर्गिकशेतीकडे

तेल का खेल

तेल का खेल

अवघ्या 30-35 वर्षाखाली खायचे तेल उत्पादनात भारत स्वावलंबी होता.आज भारत 40 ते 50%  तेल आयात करतो.35 वर्षाखाली प्रत्येक गाव तेल उत्पादनात स्वावलंबी होते.आपल्या आजोबाच्या काळात करडी,तीळ,मोहरी,शेंगदाणे यांपासून गावातच तेल काढले जायचे.लोकांना स्वस्त,शुद्ध ,ताजे,भेसळमुक्त तेल खायला मिळायचे आणि गायी,बैलांना चोथ्यापासून पेंड बनवली जायची.पण आता परिस्थिती पूर्णतः बदलली आहे.आता तेल बियांच्या नावाखाली फक्त सोयाबीन पिकवले जाते.हानिकारक केमिकल रिफायन सोयाबीन तेल आरोग्याला चांगले असल्याचा खोटा प्रचार मोठया प्रमाणात करण्यात आला.आपले घण्यापासून तयार होणारे तेल आरोग्यास हानिकारक असल्याचा खोटा प्रचार करण्यात आला.आज सोयाबीनचा दर 2400 रु प्रति क्विंटल आहे.पण शेतकऱ्यांना आता सोयाबीन पेरण्याशिवाय कुठलाही पर्याय उरला नाही.आज लाखो टन हानिकारक पाम ऑइल विदेशातून आयात केले जाते.अजूनही वेळ गेलेली नाही.या रब्बी हंगामात करडी लागवड करून त्यापासून शुद्ध घण्याचे तेल आपण काढून आणू शकतो.करडी पासून

करडई पीकच का घ्यावे?

करडई पिकाची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे तीन फुटांपेक्षा जास्त खोलीतील ओलावा व अन्नद्रव्ये शोषून घेतली जातात. त्यामुळे अवर्षणप्रवण परिस्थितीत कमी पावसाच्या वेळेस या पिकापासून हमखास उत्पादन मिळते. या पिकाच्या पानांचा आकार पूर्ण वाढीनंतर कमी होऊन कडेने काटे येतात. त्यामुळे झाडातील पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन अवर्षणात चांगल्या प्रकारे तग धरुन राहते. पानांवर मेणचटपणा असल्यामुळे देखील बाष्पीभवन कमी होते. त्यामुळे करडई हे पीक दुष्काळी विभागासाठी वरदानच ठरते.
करडई पिकास जमिनीत पुरेसा ओलावा असेल तर पाण्याची गरज भासत नाही. परंतु टंचाईच्या काळात पिकास एक ते दोन पाण्याची आवश्यकता असते, परंतु गव्हाचा विचार केल्यास त्यास पाच-सहा पाणी लागतात. म्हणजेच एक एकर गव्हाऐवजी आपण दोन-तीन एकर करडई झाल्या पीक घेऊ शकतो आणि त्यापासून जास्त फायदा घेता येतो.  तसेच वारंवार गहूपीक घेतल्यामुळे जमिनीच्या वरच्या  थरातील अन्नद्रव्ये वापरली जातात. अशा ठिकाणी थरातील अन्नद्रव्याचा आणि पाण्याचा कार्यक्षम वापर करता येईल आणि अधिक फायदा होईल खरीप पिकानंतर रब्बी हंगामात दुसरे पीक घ्यायचे असेल आणि ओलावा ठराविक प्रमाणात असेल तर करडई हे एक उत्तम पर्याय आहे .

रासायनिक खत कशासाठी ?

प्रत्येक वनस्पती ही
76% पाणी,
23% सूर्यप्रकाश व कर्बआम्लवायू CO2
1% जमीन तत्त्वापासून बनलेल्या असतात.

यातील पाणी,सूर्यप्रकाश,CO2 या गोष्टी निसर्ग आपल्याला फुकटात देतो.म्हणजे 98.85% भाग हा निसर्ग आपल्याला फुकटात उपलब्ध करून देतो.ही कृषी विद्यापीठ ना पाणी बनवतात,ना कार्बनडाय ऑक्सार्ईड बनवतात,ना पिकांना सूर्यप्रकाश देतात.राहिला प्रश्न 1.25% भागाचा जो जमिनीतून पिकांना मिळतो.बरं यातील सर्वात मोठा हिस्सा 0.75% नायट्रोजन आहे.जो वातावरणात 78% उपलब्ध आहे.
पुन्हा
0.095% स्फुरद,
0.19% पालाश,
0.22% इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये
         
         मग ही भरपूर उत्पादन काढण्याचा अहंकार बाळगणारी कृषी विद्यापीठं नेमका कश्याचा अहंकार बाळगतात ?

स्वावलंबी गावासाठी आपली भूमिका ?

राजकारण सोडून समाजासाठी,स्वतः साठी आपण खूप काही चांगले,सकारात्मक करू शकतो.

स्वावलंबन,
लघू उद्योग,
प्रक्रिया उदयोग,
जीवनोपयोगी मूल्यंधारीत शिक्षण,
खेळ,
स्वावलंबी कृषी पद्धती,
जल व्यवस्थापन,
व्यसनमुक्ती,
स्वच्छता,
पर्यावरण,
कचरा व्यवस्थापन,
योग,
आयुर्वेद,
ध्यान पद्धती,
बायोगॅस,
सोलार,
इथेनॉल,

यासारख्या अनेक मुद्द्यांवर आपण काम करायला हवं.यातील प्रत्येक मुद्दा हा मानवी जीवन चांगले बनवण्यासाठी योगदान देऊ शकतो.पण या मुद्द्यांचा विचार राजकारण सोडल्याशिवाय होणार नाही.वरील मुद्दे स्थानिक लोकांच्या मदतीने नक्की साध्य करता येतात.यासारखी कामे पूर्ण करण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष समर्थ नाही.आणि यासारख्या लोकोपयोगी सामाजिक कार्यांना रोखण्याची हिम्मत कुठल्याही राजकीय पक्षात नाही.तेंव्हा राजकारण सोडून आपण एखादया समाज उपयोगी मुद्द्यावर अभ्यास करावा.ते व्यवहारात कसे आणता येतील यासाठी प्रयत्न करावेत .

हवा प्रदूषणावर उपाय ?

नैसर्गिक शेती करणारा शेतकरी शेतातील एकही काडी जाळत नाही.

*तर दुसरीकडे पंजाब व हरियाणाच्या शेतकऱ्यांच्या काडी कचरा ( परोली ) जाळण्यामुळे दिल्लीमध्ये भयंकर प्रदूषण होत आहे.अशी पर्यावरणाला,सजीव सृष्टीला हानिकारक शेती पद्धती योग्य की अयोग्य ? यावर राष्ट्रीय स्तरावर चर्चा व्हायला हवी. *एकट्या पंजाबच्या शेतकऱ्यांना पराली जाळण्यापासून थांबवण्यासाठी सरकारला 4000 कोटी रुपये लागणार आहेत.*

यावरून समस्येची तीव्रता आपल्या लक्षात येते.रासायनिक शेतीचा प्रचार करणाऱ्या दलाल कृषी विद्यापिठाणी या परालीचे महत्त्व कधी शेतकऱ्यांना सांगितलेच नाही.पाळेकर गुरुजींनी या काडी कचऱ्याला आपल्या भूमातेच्या साडीची उपमा दिली आहे.ऊन,वारा,पाऊस यांपासून जमिनीचे, गांडूळ व जिवाणूंचे रक्षण करून जमिनीला ताकत देण्याचे काम काडी कचरा ( आच्छादन ) करते. नैसर्गिक शेती करणारा शेतकरी हजारो रुपयांच्या रासायनिक खतांना पर्यायी खत म्हणून याकडे पाहतो.या बदमाश कृषी विद्यापीठाणा आता लक्षात आले आहे की,

*आत्ता पर्येंत आपली शेती पिकली ती रासायनिक खतांमुळे नव्हे*

तर वर्षानुवर्षे आपल्या पूर्वजांनी जमिनीत साठवलेल्या सेंद्रीय कर्बामुळे.आज हा सेंद्रिय कर्ब 0.3 पेक्षाही कमी झाला आहे.आपल्या जमिनी वेगाने नापीक होत आहे.शेतकऱ्यांना समृद्ध व देशाला प्रदूषण मुक्त स्वावलंबी व निरोगी बनवण्याचे काम फक्त झिरो बजेट नैसर्गिक शेती करू शकते.

#चलानैसर्गिकशेतीकडे

निसर्ग उभारायचा असेल तर ?

नैसर्गिक ऊस शेतीची चमत्कारिक वैशिष्ट्ये

*नैसर्गिक ऊस शेतीची चमत्कारिक वैशिष्ट्य -*

1.झिरो बजेट नैसर्गिक शेतीत उसाची कमीत कमी  8×2 फूट अंतरावर लागवड केली जाते.
2.एका एकरात फक्त 2722 डोळे लागतात.म्हणजे फक्त 200 उसामध्ये 1 एक्करची लागवड पूर्ण होते. *म्हणजे बेण्याचा खर्च फक्त 1200 रुपये होतो.*
3.लागवडीसाठी मजुरांचा खर्च 25% होईल.
4.फक्त 20% पाणी लागेल.
5.प्रत्येक ऊस 2 किलोपेक्षा जास्त वजनाचा असेल.
6.मुळ्यांची वाढ 4 फूट खोल व लांब होते.म्हणजे उसात जास्त दमदारपणा.
7. *उसाची उंची 15 ते 20 फुटांपर्यंत जाते.*
8.प्रत्येक डोळ्याला 15 पेक्षा जास्त फुटवे.
*9.एकदा लागवड केल्यानंतर 1000 वर्षापर्यंत खोडवा घेता येतो.*
10.आंतरपिकांतून ऊसाचा संपूर्ण खर्च वसूल होतो.
*11.अगदी प्रतिकूल परिस्थितीतही एकरी 40 ते 80 टनाचे उत्पादन.*
*12.ना रासायनिक खत,ना गांडूळ खत,ना शेणखत,ना कंपोस्ट खत फक्त जीवामृत व घनजीवामृत वापर .*
13.कुठल्याही परिस्थितीत ऊस पडत नाही.
14.कुठलीही कीड व रोग येत नाही.
15.जमिनीच्या सुपिकतेत वाढ होते.
16.कुठल्याही प्रकारची मशागत न करताही गांडुळांमुळे जमीन भुसभुशीत रहाते.

तर मित्रांनो,

#चलानैसर्गिकशेतीकडे