Saturday, 30 December 2017

रासायनिक खत कशासाठी ?

प्रत्येक वनस्पती ही
76% पाणी,
23% सूर्यप्रकाश व कर्बआम्लवायू CO2
1% जमीन तत्त्वापासून बनलेल्या असतात.

यातील पाणी,सूर्यप्रकाश,CO2 या गोष्टी निसर्ग आपल्याला फुकटात देतो.म्हणजे 98.85% भाग हा निसर्ग आपल्याला फुकटात उपलब्ध करून देतो.ही कृषी विद्यापीठ ना पाणी बनवतात,ना कार्बनडाय ऑक्सार्ईड बनवतात,ना पिकांना सूर्यप्रकाश देतात.राहिला प्रश्न 1.25% भागाचा जो जमिनीतून पिकांना मिळतो.बरं यातील सर्वात मोठा हिस्सा 0.75% नायट्रोजन आहे.जो वातावरणात 78% उपलब्ध आहे.
पुन्हा
0.095% स्फुरद,
0.19% पालाश,
0.22% इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये
         
         मग ही भरपूर उत्पादन काढण्याचा अहंकार बाळगणारी कृषी विद्यापीठं नेमका कश्याचा अहंकार बाळगतात ?

स्वावलंबी गावासाठी आपली भूमिका ?

राजकारण सोडून समाजासाठी,स्वतः साठी आपण खूप काही चांगले,सकारात्मक करू शकतो.

स्वावलंबन,
लघू उद्योग,
प्रक्रिया उदयोग,
जीवनोपयोगी मूल्यंधारीत शिक्षण,
खेळ,
स्वावलंबी कृषी पद्धती,
जल व्यवस्थापन,
व्यसनमुक्ती,
स्वच्छता,
पर्यावरण,
कचरा व्यवस्थापन,
योग,
आयुर्वेद,
ध्यान पद्धती,
बायोगॅस,
सोलार,
इथेनॉल,

यासारख्या अनेक मुद्द्यांवर आपण काम करायला हवं.यातील प्रत्येक मुद्दा हा मानवी जीवन चांगले बनवण्यासाठी योगदान देऊ शकतो.पण या मुद्द्यांचा विचार राजकारण सोडल्याशिवाय होणार नाही.वरील मुद्दे स्थानिक लोकांच्या मदतीने नक्की साध्य करता येतात.यासारखी कामे पूर्ण करण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष समर्थ नाही.आणि यासारख्या लोकोपयोगी सामाजिक कार्यांना रोखण्याची हिम्मत कुठल्याही राजकीय पक्षात नाही.तेंव्हा राजकारण सोडून आपण एखादया समाज उपयोगी मुद्द्यावर अभ्यास करावा.ते व्यवहारात कसे आणता येतील यासाठी प्रयत्न करावेत .

हवा प्रदूषणावर उपाय ?

नैसर्गिक शेती करणारा शेतकरी शेतातील एकही काडी जाळत नाही.

*तर दुसरीकडे पंजाब व हरियाणाच्या शेतकऱ्यांच्या काडी कचरा ( परोली ) जाळण्यामुळे दिल्लीमध्ये भयंकर प्रदूषण होत आहे.अशी पर्यावरणाला,सजीव सृष्टीला हानिकारक शेती पद्धती योग्य की अयोग्य ? यावर राष्ट्रीय स्तरावर चर्चा व्हायला हवी. *एकट्या पंजाबच्या शेतकऱ्यांना पराली जाळण्यापासून थांबवण्यासाठी सरकारला 4000 कोटी रुपये लागणार आहेत.*

यावरून समस्येची तीव्रता आपल्या लक्षात येते.रासायनिक शेतीचा प्रचार करणाऱ्या दलाल कृषी विद्यापिठाणी या परालीचे महत्त्व कधी शेतकऱ्यांना सांगितलेच नाही.पाळेकर गुरुजींनी या काडी कचऱ्याला आपल्या भूमातेच्या साडीची उपमा दिली आहे.ऊन,वारा,पाऊस यांपासून जमिनीचे, गांडूळ व जिवाणूंचे रक्षण करून जमिनीला ताकत देण्याचे काम काडी कचरा ( आच्छादन ) करते. नैसर्गिक शेती करणारा शेतकरी हजारो रुपयांच्या रासायनिक खतांना पर्यायी खत म्हणून याकडे पाहतो.या बदमाश कृषी विद्यापीठाणा आता लक्षात आले आहे की,

*आत्ता पर्येंत आपली शेती पिकली ती रासायनिक खतांमुळे नव्हे*

तर वर्षानुवर्षे आपल्या पूर्वजांनी जमिनीत साठवलेल्या सेंद्रीय कर्बामुळे.आज हा सेंद्रिय कर्ब 0.3 पेक्षाही कमी झाला आहे.आपल्या जमिनी वेगाने नापीक होत आहे.शेतकऱ्यांना समृद्ध व देशाला प्रदूषण मुक्त स्वावलंबी व निरोगी बनवण्याचे काम फक्त झिरो बजेट नैसर्गिक शेती करू शकते.

#चलानैसर्गिकशेतीकडे

निसर्ग उभारायचा असेल तर ?

नैसर्गिक ऊस शेतीची चमत्कारिक वैशिष्ट्ये

*नैसर्गिक ऊस शेतीची चमत्कारिक वैशिष्ट्य -*

1.झिरो बजेट नैसर्गिक शेतीत उसाची कमीत कमी  8×2 फूट अंतरावर लागवड केली जाते.
2.एका एकरात फक्त 2722 डोळे लागतात.म्हणजे फक्त 200 उसामध्ये 1 एक्करची लागवड पूर्ण होते. *म्हणजे बेण्याचा खर्च फक्त 1200 रुपये होतो.*
3.लागवडीसाठी मजुरांचा खर्च 25% होईल.
4.फक्त 20% पाणी लागेल.
5.प्रत्येक ऊस 2 किलोपेक्षा जास्त वजनाचा असेल.
6.मुळ्यांची वाढ 4 फूट खोल व लांब होते.म्हणजे उसात जास्त दमदारपणा.
7. *उसाची उंची 15 ते 20 फुटांपर्यंत जाते.*
8.प्रत्येक डोळ्याला 15 पेक्षा जास्त फुटवे.
*9.एकदा लागवड केल्यानंतर 1000 वर्षापर्यंत खोडवा घेता येतो.*
10.आंतरपिकांतून ऊसाचा संपूर्ण खर्च वसूल होतो.
*11.अगदी प्रतिकूल परिस्थितीतही एकरी 40 ते 80 टनाचे उत्पादन.*
*12.ना रासायनिक खत,ना गांडूळ खत,ना शेणखत,ना कंपोस्ट खत फक्त जीवामृत व घनजीवामृत वापर .*
13.कुठल्याही परिस्थितीत ऊस पडत नाही.
14.कुठलीही कीड व रोग येत नाही.
15.जमिनीच्या सुपिकतेत वाढ होते.
16.कुठल्याही प्रकारची मशागत न करताही गांडुळांमुळे जमीन भुसभुशीत रहाते.

तर मित्रांनो,

#चलानैसर्गिकशेतीकडे

रासायनिक शेतीची वैशिष्ट्य

*रासायनिक शेतीची वैशिष्ट्य -*

🌱खर्चिक
🌱विषारी
🌱पाणी प्रदूषित करणारी
🌱हवेचे प्रदूषण
🌱नापीक जमीन
🌱शेतकऱ्यांचे कर्ज वाढवणारी
🌱कर्जातून आत्महत्या
🌱गांडूळ नष्ट करणारी
🌱उपयुक्त जिवाणू संपावणारी
🌱बेभरवशाची
🌱नैसर्गिक आपत्तीत जास्त नुकसान
🌱भाव पडल्यास खर्चही निघणे अवघड
🌱किडी व रोगांमध्ये वाढ
🌱चव,स्वाद व पोषकता घालवणारी
🌱भारताची आयात वाढवणारी
🌱झाड़े,पशु,पक्षी,कीटक नष्ट करणारी
🌱शेतीची उत्पादकता घटवणारी
🌱आंतरपीक पद्धती नष्ट करणारी
🌱भाज्या फळे धान्य तेल यातील विविधता नष्ट करणारी 🌱पाणी,वीज,वाहतूक,शहरीकरण,बेरोजगारी वाढवणारी
🌱संपत्तीचे केंद्रीकरण करणारी
🌱निसर्गाचे शोषण करणारी
🌱महागाई वाढवणारी
🌱ग्रामीण उद्योग,लघु उद्योग नष्ट करणारी
🌱नैसर्गिक संकटाचा सामना न करू शकणारी
🌱शेतकऱ्यांना ग्राहकांना फसवून लूट करणारी

*रासायनिक शेतीचे कट्टर समर्थन करणाराही वरील मुद्द्यांशी सहमत असेल असे मला वाटते.रासायनिक शेतीच्या समर्थनासाठी फक्त एक मुद्दा मांडला जातो तो म्हणजे उत्पादन जास्त मिळते.जो चुकीचा आहे.नैसर्गिक शेतीत आतरपिकांच्या माध्यामातून दुप्पट तिप्पट उत्पन्न काढता येते.जे रासायनिक शेतीत शक्य नाही.तेंव्हा मित्रांनो.......*

#चलानैसर्गिकशेतीकडे

नैसर्गिक शेती पसरत का नाही ?

*खूप सारे लोक म्हणतात की नैसर्गिक शेती इतकी चांगली आहे तर मग ती गतीने पसरत का नाही ?*

1.गावरान गायींची कमतरता असल्यामुळे ही शेती पसरायला वेळ लागत आहे.पाळेकर गुरुजींच्या म्हणण्यानुसार सकाळी 5 वाजता उठून आपण डायरेक्ट गोमूत्र पकडून ही गरज पूर्ण करू शकतो.पण सकाळी उठून गोमूत्र पकडण्याची तयारी फार थोड्या शेतकऱ्यांची असते.व्यवस्थित गोठा करून नालीने गोमूत्र जमा करण्यासाठी 3 ते 4 गायी व बैलजोडी लागते.यावर पर्याय म्हणजे बरेचसे शेतकरी गोशाळेतून गोमूत्र आणतात व नैसर्गिक शेती करतात.
2.नैसर्गिक शेतीत पहिल्याच वर्षी उत्पन्न रासायनिक शेती इतकेच किंवा त्यापेक्षा जास्त येते,असे असले तरी सर्वच शेतकरी मजूर,रोपे,बियाणे,वेळ,गोमूत्र  उपलब्ध नसल्यामुळे आंतरपीक,आच्छादन, वापसा,सहजीवन, जीवामृत,घनजीवामृत,योग्य बिवड यासारख्या गोष्टींमध्ये कमी पडतात.परिणामी पहिल्या वर्षी उत्पादन 20 ते 30 ℅ घटू शकते.
3.ग्राहक नैसर्गिक शेतमालाला दुप्पट किंमत देत असले तरी सर्वच ग्राहक गावरान, विषमुक्त,चवदार,पौष्टिक या गोष्टींना महत्त्व देत नाहीत.बरेच ग्राहक व सर्वच व्यापारी आकार,रंग,आकर्षकपणा पाहून शेतमाल खरेदी करतात.अशी व्यवस्थाच तयार करण्यात आली आहे.नैसर्गिक शेतमाल निर्यात करतानाही या अडचणी येतात.
4.सरकार सेंद्रिय शेतीसाठी बियाणे, औषधे, गांडूळ खत,कंपोस्ट खत यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान व प्रोत्साहन देत आहे.यासाठी प्रत्येक शहरात ATMA अंतर्गत प्रशिक्षण, मार्गदर्शन,जनजागृती कार्यक्रम सुरू आहेत.ब्रँडिंग, मार्केटिंग, प्रमाणीकरण यासाठी करोडो रुपये खर्च केले जात आहेत.तरीही सेंद्रीय शेती पछाडून भरारी हीच एक गोष्ट नैसर्गिक शेतीची ताकद दर्शवते.आणि रासायनिक शेतीसाठी तर हजारो करोड रुपये खर्च होतच आहेत.
5.अपुरी प्रचार प्रसाराची साधने हे नैसर्गिक शेती न पसरण्याचे महत्त्वाचे कारण आहे.सरकार,कृषी विद्यापीठे, कंपन्या,मीडिया यांना नैसर्गिक शेतीच्या प्रचारातून काहीही फायदा दिसत नाही.त्यामुळे देशभरात 50 लाख शेतकऱ्यांनी ही कृषी पद्धती स्वीकारली असतानाही अजूनही या कृषी पद्धतीवर सार्वजनिक स्वरूपात मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत नाही.या शेती पद्धतीला पसरवण्याचे काम पूर्णतः मोठ्या स्वरूपात पाळेकर गुरुजींच्या शिबिरातून होते.कुठल्याही प्रकारची जाहिरात न देता गुरुजींच्या शिबिरांना हजारो शेतकरी उपस्थित रहातात. देशाच्या कानाकोपऱ्यात असलेले नैसर्गिक शेती करणारे शेतकरी हळूहळू शेती पद्धती पसरवत आहेत.कित्येक सुशिक्षित,पर्यावरण प्रेमी,आरोग्या विषयी जागरूक लोक,साधूसंत,शेतकरी संघटन,समाजवादी,NGO व राजकीय लोकही आता या शेती पद्धतीचे महत्त्व समजून नैसर्गिक शेतीच्या प्रचाराचे काम करत आहेत.

तर मित्रांनो येत्या काळात नैसर्गिक शेती शिवाय पर्याय नाही.तेंव्हा काळाची व परिस्थितीची गरज लक्षात घेऊन आजच नैसर्गिक शेतीचे प्रयोग सुरू करा .
#चलानैसर्गिकशेतीकडे