चला आज आपण एका घनदाट जंगलात फिरायला जाऊ.कडक उन्हाळ्याच्या दिवसात जंगलामध्ये आपल्याला मोठ मोठी झाडं झुडपे वेली दिसत आहेत.वेगवेगळ्या प्रकारचे कीड़े मुंग्या प्राणी पक्षी आपल्याला दिसत आहेत.वेगवेगळ्या पक्ष्यांचे प्राण्यांचे आवाज आपल्या कानावर पडत आहेत.मानवी वस्तीपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या जंगलात प्राणी पक्षी वेली झाडं अगदी आनंदात रहात आहेत.21 व्या शतकातही आपण मानवा पासून सुरक्षित आहोत याचा जणू ते आनंदच साजरा करतायत असं वाटत आहे.प्रत्येक झाडांची आकार उंची प्रचंड मोठी आहे.मोठ मोठ्या झाडांच्या खाली असलेल्या झुडपावर पसरलेल्या फळांनी फुलांनी बहरलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेली दिसत आहेत.कडक उन्हाळ्यात 8 महिन्यापासून एकही पावसाचा थेंब न पडलेल्या या जंगलात अगदी लहान लहान रोप सुद्धा जोमात वाढत आहेत.वेली,झाडं फळा फुलांनी गच्च भरलेली आहेत.चक्क 8 महिन्यापासून या जंगलात पाण्याचा एक थेंबही पडलेला नाही असं अजिबातच वाटत नाही.हजारो वर्षापासून या जंगलांने कित्येक सतत 2-3 वर्षाचे दुष्काळ,पूर,चक्रीवादळ पाहिले आहेत तरीही हे जंगल आपले अस्तित्व टिकवून आहे.असल्या संकटातही येथील प्राणी पक्षी कीटक वेली झाडं झुडपे आपल्या जाती प्रजातीचे अस्तित्व टिकवून आहेत.लाखो ताकतवर प्राणी पक्षी आणि झाडामध्ये सुद्धा येथील छोटे छोटे कीटक प्राणी पक्षी वेली वनस्पति आपले आयुष्य आनंदाने जगत आहेत.मित्रांनो ....या जंगलात फिरताना आपल्याला खूप त्रास झाला पण मित्रांनो काळजी करू नका सरकार करोडो रुपये खर्च करून येथे लवकरच पर्यटन क्षेत्र विकसित करणार आहे .जेंव्हा आपण परत या सुंदर जंगलात येऊ तेंव्हा येथे चांगले रस्ते रेस्टॉरंट होटेल्स असतील आणि शहरातील हजारो लोकांना शुद्ध हवा आणि निसर्ग सौंदर्याचा आस्वाद येथे घेता येईल.त्यातून रोजगार वृद्धि होईल आणि येथे शुध्द हवेत तुम्हाला तुमचं सुंदर घर देखील घेता येईल.फ़क्त या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी तुमच्या खिशात भरपूर पैसे हवेत.
No comments:
Post a Comment