Saturday, 30 December 2017

फायद्याची गव्हाची शेती-बन्सी गहू

सुवर्णसंधी,सुवर्णसंधी,सुवर्णसंधी

शेतकरी मित्रांनो,या रब्बी हंगामात बंसी जातीच्या गव्हाची पेरणी करा आणि लाखो रुपये कमवा.बंसी जातीच्या गव्हाला भरपूर मागणी आहे त्यामुळेच हा गहू 40 रुपयांपासून 100 रुपयापर्यंत विकला जातो.या गव्हाचे एकरी 12-18 क्विन्टल पर्यंत उत्पादन होते. 40 च्या दराने 15 क्विंटलचे 60000 रुपये होतात.गव्हाच्या चवीचे व औषधीय गुणांचे महत्व तुमचे आजी आजोबा सांगू शकतील.या गव्हाची पोळी 2-3 दिवस दसमी सारखी नरम रहाते.आणि या गव्हाच्या पोळीला भाजी नसतानाही फ़क्त पोळी खाऊनही स्वादिष्ट चव मिळते.बंसी गहू फ़क्त 3-5 पाण्यात येतो.हा गहू जोरदार वादळात खाली पडला तरी दुसऱ्या दिवशी परत उभा रहातो.याची ओम्बी छोटी व गच्च असल्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे हा गहू खराब होत नाही.
             दुसरीकडे रासायनिक गहू करने परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी गहू पिकवणे सोडून दिले आहे.फ़क्त घरी खाण्यासाठी शेतकरी गहू पिकवत आहे.तेंव्हा शेतकरी मित्रांनो या रब्बी हंगामात अर्धा एकर तरी नैसर्गिक बंसी गहू पिकवून पहा.कुठल्याही प्रकारची शंका मनात ठेवू नका.पहिल्याच वर्षी नैसर्गिक शेतीत भरपूर उत्पादन मिळते.आणि हो ......कधी आपली भेट झाली तर वरण पोळी खाऊ घाला.😃😃

No comments: